जगता आलं पाहिजे . . .
मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे.
सुख भोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.
रंग सावळा म्हणून काय झालं,
कर्तृव उजाळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.
यशानं माणूस उंच जातो
पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.
मिळालेल्या यशात समाधान मानून
आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.
पापं काय कसंही करता येतं,
पण पुण्य करता आलं पाहिजे.
ताठ काय कोणीही राहतं,
पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.
ठेच जीवनात लागतेच,
सहन करता आली पाहिजे.
मलमपट्टी करून तिला,
पुन्हा चालता आलं पाहिजे.
शहाण्याचं सोंग घेऊन,
वेडं होता आलं पाहिजे.
कशाला बळी न पडता,
आनंदी जगता आलं पाहिजे.
जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरता आली पाहिजे.
हास्य आणि अश्रूचा मिलाप करून.
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे ...
आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे...
~प्राजक्ता गावडे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
सुख दु:ख
एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले
" गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?"
त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.
गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,
"पाण्याची चव कशी वाटली ?
तेव्हा शिष्य म्हणाला,
"अतिशय खारट".
त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?
शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.
गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."
विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!
🕉जय गुरुदेव 🕉
~प्राजक्ता गावडे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
जगावर आलयं जरी मोठं संकट
परिस्थिती असली कितीही गंभीर .....
जीवनविद्येचे ज्ञान आहे सोबत
डगमगू नकोस हो खंबीर .....
अरे रडतोस काय वेड्या
आधी डोळे पुस .....
तुझ्यापेक्षा जास्त दु:ख ज्यांचे
कर त्यांची विचारपूस .....
दे आधी धीर त्यांना
ज्यांचे घरटे तुटले आहे .....
कर मदतीचा हात पुढे
ज्यांचे आभाळ फाटले आहे .....
हीच वेळ आहे
मानव धर्म पाळण्याची .....
नाही घरात बसुन
आसवं ढाळण्याची .....
प्रसंग नाही आता
रडगाणे आळवण्याचा .....
वेळ जवळ आलाय
कोरोनाला पळवण्याचा .....
स्वत: काळजी घेऊन
इतरांची काळजी घेण्याचा .....
महाराष्ट्राला, या राष्ट्राला
पुढे पुढे नेण्याचा .....
~प्राजक्ता गावडे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आत्मविश्वास
एकदा एक मुलगी तिच्या वडिलांकडे आपल्या
आयुष्याबाबत तक्रार करत होती, की एक प्रॉब्लेम
संपला, की दुसरा सुरू होतो.
तिला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे.
व्यवसायाने शेफ असलेले तिचे वडील तिला काही न
बोलता स्वयंपाकघरात
घेऊन येतात आणि काही न बोलता तीन पातेल्यांत
पाणी उकळत ठेवतात. पाणी जरासे उकळल्यावर ते
त्यातल्या एका भांड्यात बटाटा, एकात अंडे आणि
एकात कॉफी घालतात.
दुसरीकडे त्या मुलीच्या तक्रारी सुरूच असतात.
.
साधारण वीस मिनिटांनंतर वडील गॅस बंद करतात
आणि बटाट्याला एका भांड्यात, अंड्याला दुसऱ्या
भांड्यात आणि कॉफीला एका कपामध्ये ओततात.
मुलीकडे वळून विचारतात,
'बाळा, तुला समोर काय दिसते आहे?'
ती मुलगीदेखील वडील हे काय विचारत आहेत, म्हणून
जरासे चिडून उत्तर देते,
'बटाटा, अंडे आणि कॉफी.'
ते मुलीला ती प्रत्येक वस्तू जवळून पाहायला
सांगतात.
.
ती बटाट्याला हात लावते, तर तो मऊ झालेला
असतो.
अंड फोडून पाहिल्यावर ते उकडून कडक झालेले असते.
ते तिला कॉफी प्यायला सांगतात. ती चवदार
कॉफी पिऊन तिच्या चेहऱ्यावर समाधान येते.
.
वडील तिला समजावतात.
यातील बटाटा, अंडे आणि कॉफी या तिघांनाही
गरम पाण्यातून खडतर प्रवास करावा लागला; पण
त्याच्याशी प्रत्येकाने प्रत्येक वेळी सामना केला.
कडक आणि ताठ बटाटा गरम पाण्याला सामोरे
गेल्यावर नरम
पडला.
आतून लिबलिबित, मऊ असलेले अंडे गरम पाण्यात
पडताच बदलत गेले आणि बाहेर आले उकडलेले कडक अंडे;
.
पण या सगळ्यात कॉफीची कमाल आहे. ती गरम
पाण्यात टाकल्याबरोबर तिने पाण्यालाच बदलले
आणि त्यातून काहीतरी नवे पेय तयार झाले.
ते मुलीकडे वळून म्हणतात, 'आता विचार तू करायचा
आहेस.
या तिन्हीपैकी तू कोण आहेस?'
.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संकटे, अवघड प्रसंग
येतच असतात.
त्यांना सामोरे जाताना एकच महत्त्वाची बाब
म्हणजे आपल्यावर त्यांचा कसा परिणाम होतो
आणि त्या परिस्थितीला आपण कसे तोंड देतो.
.
हे केवळ त्या मुलीच्याच बाबतीत नाही, तर आपल्या
सर्वांनाही लागू पडते. आपण स्वतःला फक्त प्रश्न
विचारायचा,
'या तिन्हीपैकी मी कोण?'
.
जीवनात मागे बघाल तर,
अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर,
आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,
सत्य मिळेल...
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,
आत्मविश्वास मिळेल
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know